Marathi Blog

October 2024

स्किझोफ्रेनिया बद्दल काही सामान्य गैरसमज

* गैरसमज 1: स्किझोफ्रेनिया असलेले लोक हिंसक असतात. वास्तव: बहुतेक स्किझोफ्रेनिया असलेले लोक हिंसक नसतात. खरं तर, ते स्वतःच हिंसाचाराचा बळी होण्याची शक्यता जास्त असते. हिंसाचाराशी संबंधित गुन्हेगारीचे प्रमाण सामान्य लोकसंख्येपेक्षा स्किझोफ्रेनिया असलेल्या लोकांमध्ये कमी आहे. * गैरसमज 2: स्किझोफ्रेनिया हा कमकुवतपणाचा किंवा व्यक्तिमत्त्वाचा दोष आहे. वास्तव: स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे ज्याची कारणे आनुवंशिकता आणि पर्यावरणीय घटकांच्या जटिल संवादाशी संबंधित आहे. हे कमकुवतपणाचा किंवा व्यक्तिमत्त्वाचा दोष नाही. * गैरसमज 3: स्किझोफ्रेनिया असलेले लोक वास्तविकतेपासून वेगळे असतात. वास्तव: स्किझोफ्रेनिया असलेले लोक वास्तविकतेशी [...]

September 2022

स्वत्व हरवताना

स्वत्व हरवताना जागतिक अल्झायमर दिवसाच्या निमित्ताने. आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा ठेवा म्हणजे आपल्या आठवणी. आपल्या जडण-घडणे पासून अगदी शेवटपर्यंत अगदी आपल्या हक्काची गोष्ट असतात त्या. चांगल्या-वाईट, हसऱ्या-दुखऱ्या, नवीन-जुन्या, हव्या असलेल्या- नको असलेल्या अगदी कशा ही असल्या तरी जपलेल्या आणि म्हणूनच आपले स्वत्व बनलेल्या. माझ्या मते आपण कोण असतो तर “आपण आपल्या आठवणींचा संग्रह असतो.” पण अशा या आठवणींना घरघर लागली तर ? आहेत त्या आठवणी पुसट होत चालल्या आणि नवीन आठवणी तयारच करता नाही आल्या तर ? आपलेच घर आपल्याला रोज अनोळखी [...]

May 2022

माणूसपण हिरावणारा आजार

२४ मे जागतिक स्किझोफ्रेनिया दिवसानिमित्त.                 आपल्या आजूबाजूला अश्या बऱ्याच घटना घडत असतात, ज्या चुकीच्या असतात हे कुठेतरी कळते पण त्यामध्ये अधिक लक्ष देऊन ते जाणुन घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेळ नसतो किंवा आपला पूर्वग्रह आपल्याला अशा गोष्टी समजुन घेण्याला आडवा येतो. माणसाच्या वागणुकीत होणारा बदल ही देखील अशीच एक गोष्ट. अचानक किंवा बऱ्याच वेळा हळू हळू एखाद्याच्या वर्तणुकीत होत जाणारा बदल हा नक्कीच कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच तर लेखनामध्ये, सिनेमा मध्ये [...]

June 2021

जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस निमित्त

अशी कल्पना करा की , तुम्ही एका टीव्ही शोरूम मध्ये आहात. हजारो टीव्ही आहेत, सर्वच्या सर्व फुल्ल आवाजात आणि वेगवेगळ्या चॅनेल वर लावलेले आहेत. आता त्यातल्या एका टीव्हीवर लक्ष केंद्रित करून दाखवा. कल्पना सुद्धा अवघड वाटते ना ? अगदी असेच असते स्किझोफ्रेनिया झालेल्या व्यक्तीचे रोजचे आयुष्य. त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या सर्वच गोष्टी महत्वाच्या वाटतात, त्यांच्या मेंदूला ही सगळी पंचेंद्रियांकडून येणारी माहिती व्यवस्थित हाताळता येत नाही आणि त्यामुळे कुठलाही ठाम निर्णय घेता येत नाही. त्यामुळेच या व्यक्ती वेगळ्या पद्धतीने वागतात, विचार [...]

December 2020

July 2020

जया अंगी मोठेपण….

     सध्याच्या काळात सोशल मीडिया वर जेव्हा रोज विज्ञानाला आणि वैज्ञानिक विचार पद्धतीला मारलेले खडे पाहतो ना तेव्हा खरच वाईट वाटते. भावनिक आवाहन आणि काहीतरी आतर्किक तर्क यांची छान सरमिसळ केलेली असते. मग असे मेसेज वाचणाऱ्यांना ते आवडते कारण त्यात भावनेला आवाहन असते, कोणालातरी शिव्या घातलेल्या असतात. आणि त्याला 'फॉरवोर्ड्स मुल्य' असते म्हणजे अशी पोस्ट पाठवल्याने त्या व्यक्तीला बाकीची लोकं लक्षात ठेवणार असतात त्यामुळे वनव्यापेक्षा जास्त वेगाने अशा काही पोस्ट फिरतात. हे 'फॉरवोर्ड्स मुल्य' ती पोस्ट फक्त [...]

April 2020

गरज सरो वैद्य उरो

    (कोणी कितीही उलट सुलट बोलले तरी डॉक्टर त्यांचे काम प्रामाणिक पणे करत होते, करत आहेत आणि करत राहतील.)     आजकाल कोरोना दरम्यान आणि जेव्हा जेव्हा डॉक्टरांवर संकट आले आहे, तेव्हा तेव्हा काही लोक त्यांच्या बाजुने उभी राहण्यापेक्षा, त्यांची बाजु समजुन न घेता त्यांची माप काढण्यात धन्यता मानत आहेत. अशा सर्व पुण्यात्म्यांना स्मरून…..(सन्माननीय अपवाद सगळीकडे असतात. या संदर्भात तर फारच तुरळक आहेत उगाच चान्स दिलाय म्हणून स्वतः ला अपवादात मोजू नये.)      ही डॉक्टरांची मापं काढणारी मंडळी कोण असतील बरं ? [...]

कालाय तस्मै नमः (कोरोना आणि आपण)

    असे नाव देण्याचे कारण, काळ (वेळ) हि निसर्गातील अशी गोष्ट आहे, जी कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या अस्तित्वाची किंमत दाखवून देते. खरेतर माणसांची लायकी दाखवुन देते म्हणा ना हवे तर. स्वतः ला उत्क्रांतीच्या सप्तसोपानावर आरूढ समजणाऱ्या मानवाला निसर्गाने दिलेली कोरोनारुपी चपराक आहे ही. माणसाच्या आयुष्याकडे पाहण्याच्या संकल्पना ज्यामुळे बदलतात त्यामध्ये साथींच्या आजारांचा सिंहाचा वाटा आहे, पण हे क्षेत्र खुपच दुर्लक्षित आहे. इतिहासामध्ये मानवाच्या प्रगती मध्ये जी मोठी आणि अनपेक्षित वळणं आली आहेत त्यातली बरीचशी साथींच्या आजारामुळे आहेत. उदा. युद्धाचे [...]

March 2020

विचारवंतांना आवाहन

    आजकाल चौका चौकातील अड्ड्यावर कुत्र्यांच्या मीटिंग भरत आहेत. होर्डिंग वर नेहमी दिसणारे प्रेरणास्त्रोत, अप्पा, दादा, पप्पू, भाऊ, चिंट्या हे या अडचणीच्या वेळेस कुठे गेले असावेत ? असा एकंदरीत त्यांचा चर्चेचा सुर असावा. म्हणजे त्यांनी घरातच बसावे अशीच माझीही इच्छा. कदाचित बंद असल्यामुळे त्यांची 'द्रव्य' रुपी प्रेरणा कमी पडली असावी हा माझा निष्कर्ष, द्रव्य रुपीचे सगळे अर्थ काढावेत.     दादागिरी करून वर्गणी मागणारे, देवापुढे रात्रीच्या वेळी पत्ते खेळणारे, आणि काम करणाऱ्याला हमखास काम कसे करावे याचे सल्ले देण्याचे यांचे कौशल्य आज या [...]

वैश्विक आजारांच्या साथी आणि आपले मानसिक आरोग्य भाग १

                   सार्स , इबोला , H१ N१ आणि झिका यांनी आपल्याला आपण साथींच्या आजारांमध्ये किती अस्वस्थ होऊ शकतो याची जाणीव मागील वीस वर्षात आपल्याला करून दिलेली आहे. यांच्या आधी अंदाजे शंभर ते एकशे वीस वर्षांपूर्वी आणि त्याआधी अशा साथी येऊन गेल्या आहेत पण तेव्हा मानसिक आरोग्याचे क्षेत्र अगदीच बाल्यावस्थेत होते, त्यामुळे अशा विषयाला हात घालण्याचा तेव्हा प्रश्नच नव्हता.                            पण [...]

December 2019

Inhalant Abuse

इन्हेलंट ऍब्युझ (Inhalant Abuse) म्हणजे मुद्दामहून चांगले वाटते म्हणून वर उल्लेख केलेल्या पदार्थाचा केलेला वारेमाप वापर. हा समाजातील सर्व स्तरातील मुलांमध्ये दिसून येतो. मुलामुलींमध्ये याचे प्रमाण सारखेच आहे. सहज, स्वस्त आणि कायद्याने मान्यता असलेले असे हे पदार्थ असतात. त्यातच बरेच शैक्षणिक क्षेत्रात रोजच वापरात येतात. त्यामुळे याचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे पदार्थ पटकन लपवता येतात झटकन काम होते आणि आलेली झिंग दहा ते पंधरा मिनिटात निघून पण जाते. आणि हे पदार्थ व्यसनासाठी वापरले जाऊ शकतात याची पुसटशी ही [...]

November 2019

चूक कोणाची ?

साधना (अर्थातच नाव बदलले आहे) एक 38 वर्षांची लग्न झालेली पण तिकडील वागणुकीला वैतागुन माहेरी आलेली. माहेरी येताना झालेली तिची फरफट आणि नंतर येथे सामावून घेताना आलेल्या अडचणींमुळे ती नैराश्याच्या गर्तेत ढकलली गेली. अगदी आत्महत्येचे नियोजन करू लागली आणि त्या दरम्यान आमची भेट झालेली. खरंतर तिच्या मनाविरुद्ध तिचा भाऊ तिला घेऊन आलेला. कारण बाकीच्यांसारखे तिचेही हेच मत होते की, मनोविकारतज्ञ (Psychiatrist) म्हणजे वेड्यांचे डॉक्टर, मला नाही भेटायचे त्यांना आणि मी वेडी नाहीये. सुरुवातीच्या दोन तीन भेटींमध्ये, तिच्या घरची आणि तिच्या [...]

October 2019

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच.

XyZ :- हॅलो ! डॉक्टर मुक्तेश बोलत आहात ना ? मी :- हो मीच बोलतोय. हा माझाच नंबर आहे ना ! XyZ :- नाही आज दिवाळी आहे ना म्हणून असे विचारले. काय म्हणतीये दिवाळी ? मी :- काही नाही घरच्यांबरोबर मस्त गप्पा मारतोय. फोन केलाय काही विशेष ? XyZ :- अहो औषधे संपली आहेत. तुम्ही बोलावले होते म्हणून फोन केलाय. मी :- कधी संपली ? XyZ :- झाले दहा दिवस, दिवाळीच्या तयारीत बिझी होतो ना ! त्यामुळे नाही जमले. आज दिवाळी आहे, म्हंटले गर्दी कमी [...]

Antidepressant Drugs Consumption

आपल्याकडे एकतर मनोविकार तज्ञाला भेटायलाच येणार नाहीत. (माहिती असून अंगावर दुखणे काढणाऱ्यांविषयी बोलतोय मी) आले तरी यांचे पहिले वाक्य असते. मी झोपेच्या गोळ्या खाणार नाही. या गोळ्यांची सवय लागते. मानसिक आजारांविषयी आणि त्यांच्या उपचारांविषयी असणाऱ्या अफाट अज्ञानामुळे हे असे बोलतात हे माहिती आहे. पण जेव्हा आम्ही सगळे समजावून सांगतो आणि तरीही लोक औषधोपचार बंद करतात, कारण त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना काहीतरी ज्ञान (कानमंत्र) दिलेले असते. असा राग येतो ना!! पण प्रश्नही पडतो जे आम्हांला तीस मिनिटांमध्ये जमत नाही ते, त्यांचा शेजारी एका वाक्यात [...]

नित्य नविन फंडे

आजकाल पेपर वाचणे आणि बातम्या पाहणे, हे म्हणजे अगदीच जाहिराती पाहण्याची इच्छा झाली तरच मी करतो. याची जागा बऱ्यापैकी सोशल मीडिया ने घेतली आहे. मग या 24 तास अखंड वाहणाऱ्या फॉरवोर्ड रुपी नदीतील सुद्धा सगळेच हाती लागेल, असे होणे नाही. तरीपण काही गोष्टी अगदीच लक्ष खेचून घेतात. आणि मग पडतात ते वेगवेगळे प्रश्न. रोज शपथ घेतल्यावर, शपथेची ताकद वाढते की कमी होते ? हा अगदी सकाळीच डोक्यात आलेला विषय. एखाद्या गोष्टीची शपथ द्यावी लागणे म्हणजे ती नक्कीच तेव्हढी महत्वाची आहे, [...]

गोळ्या संपल्या का रे ह्याच्या ?

सध्या निवडणूकीची धामधूम आहे. वेगवेगळे नेते आपल्या आर्थिक आणि बौद्धिक कुवतीनुसार स्टंटबाजी करत असतात. ते तर करणारच त्यांचे ते कामच आहे. पण एखादी स्टंटबाजी जास्तच वेगळी झाली की, मग खरा खेळ चालू होतो. खेळ, तो कोणता तर त्यांच्या त्या फालतू स्टंट बाजीला मानसिक आरोग्याशी आणि आजाराशी जोडण्याचा. यात मोठे मोठे राजकीय कारकिर्द असणारे नेते सुद्धा मागे नाहीत. मग “याचे डोके सटकले आहे” यापासून सुरू होणारी यांची मुक्ताफळे, “याच्या गोळ्या (मनोविकारतज्ज्ञांनी दिलेल्या) संपल्या असतील.” इथपर्यंत किंवा कधीतरी यापेक्षाही खालच्या पातळीवर घसरतात. [...]

WORLD MENTAL HEALTH DAY

आज 10 ऑक्टोबर म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. मानसिक आरोग्याचा प्रचार आणि प्रसार हा याचा मुळ उद्देश. माझ्यासारख्या मनोविकारतज्ञाला भेटणारे सर्वच म्हणतात की आजकाल तुम्हां सायकियाट्रिस्ट लोकांची खूप गरज आहे. पण जेव्हा खरंच गरज असते तेव्हा आपण काय करतो ? जेव्हा आपल्या घरातील कोणाला, मित्राला, शेजाऱ्याला जेव्हा सायकियाट्रिस्ट कडे घेऊन जातात, त्यानंतर आपण त्यांच्याशी कसे वागतो ? जेव्हा त्या व्यक्तीला आपल्या मदतीची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा आपण काय करतो ? दुसऱ्याचे सोडा, जेव्हा आपले नेहमीचे डॉक्टर आपल्याला सायकियाट्रिस्ट ला भेटण्याचा सल्ला देतात, [...]

नात्यांतील सीमोल्लंघन

नाती, कितीतरी प्रकारची, कितीतरी तऱ्हेची. आयुष्य सुरू करणारी, फुलवणारी, रंगवणारी, उद्धस्त करणारी आणि उध्वस्तपणातून परत सावरणारी सुद्धा. आयुष्याला खरा अर्थ येतो तो अश्या चांगल्या जोपासलेल्या, सांभाळलेल्या आणि खुलवलेल्या नात्यांनी. पण आज आजूबाजूला पाहिल्यावर काय दिसते. तर आपण ! आपल्या बऱ्याच हसत्या खेळत्या नात्यांना प्रोफेशनल या गोंडस नावाखाली कोंडून ठेवले आहे किंवा त्याला तसा मुलामा तरी दिला आहे. छान हसणारे आणि सांभाळून घेणारे ते नाते, प्रोफेशनल कधी झाले आणि त्याला व्यवहाराचे नियम कधी लागले. त्यात नको असलेला पोक्तपणा कधी शिरला हे [...]

वैचारिकतेचा विचार करताना

ते शास्त्र असते. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला जर ती पटवून द्यायची असेल तर ‘शास्त्र’ हा शब्द तिला जोडून द्यायचा, काम झालेच म्हणून समजा. कारण एकमेव भारतातील शास्त्र हे असे आहे की त्याच्या चिकित्सेला परवानगी नाही. असे केल्याने शास्राचा अपमान होतो, हे पण शास्रातच लिहिलेले आहे म्हणे. उदाहरण द्यायची गरज नाही ज्याने त्याने आप आपल्या आजूबाजूला थोडेसे चिकित्सेने पाहिले तरी बरीच उदाहरणे दिसतील. तर अश्या संस्कारांमध्ये वाढलेल्या मुलांनी पुढे जाऊन स्वतःच वैचारिक दृष्टिकोन (Critical Thinking) शिकावा अशी आपली अपेक्षा आहे. जी की [...]

जगणं थांबवलेली माणसे.

“अरे काय महेश, काय चाललंय तुझे ? ज्या ट्रिपची आपण एव्हढी स्वप्न रंगवलेली, ती का कॅन्सल केलीस ? थांब रे बाबा ऑफिसमध्ये जरा गडबड आहे, नंतर जाऊच की.” “अगं संध्या, कधीतरी येत जा की कीटी पार्टीला. सगळ्यांच्या भेटीगाठी होतात, छान वाटते. एवढं क्लिनिक जरा सेट होऊ दे, मग नक्की.” “घेतलेस का नवीन कपडे अम्या ? की तुझे नेहमीसारखेच जरा वजन कमी करतो मग घेतोच की.” “काय रे श्रेयांश घेतलास का कॅमेरा ? की परत दिवाळीच्या बोनस ची वाट पाहतो आहेस तुझा छंद [...]

आणि त्याला भुते दिसली….

भूत…. लहानपणापासूनच सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय असतो, तसाच तो राहुलचाही होता. तो नेहमी त्याच्या गावातील भुतांच्या चर्चेमध्ये हिरीरीने भाग घ्यायचा, आणि ठणकावून सांगायचा भूत वगैरे काही नसते. राहूल एक पंचवीस वर्षाचा दुधाचा व्यवसाय करणारा, एकत्र कुटुंबात राहणारा मुलगा. सगळे व्यवस्थित चाललेले आणि आता वय झाले म्हणून त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झालेली. काही दिवसांनी मुलगी पसंत झाली आणि लवकरच त्याचे लग्न ठरले. या धामधुमीत तो सतत नातेवाईकांनी वेढलेला होता. आणि हे लग्न ठरल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जी की अमावस्येची रात्र होती. अचानक [...]

September 2019

मिडब्रेन एक्टीवेशन – एक आधुनिक भोंदूगिरी

मिडब्रेन एक्टीवेशन हे आधुनिक बुवाबाजीचे खास उदाहरण! असली भोंदूगिरी तथाकथित धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा घातक होत चालली आहे. यांत सामान्य नागरीकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. त्याला वैज्ञानिक व वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार हवा तेवढा विरोध करतांना दिसत नाहीत. एकीकडे अनेक धार्मिक श्रद्धा लोकांना जीवनाची विधायक दिशा देतांना दिसतात तर दुसरीकडे असले विज्ञानाचा बुरखा घातलेल्या ह्या गैरव्यापारी वृत्ती समाजाची दिशाभूल करतांना दिसतात. (गैरव्यापारी यासाठी की व्यापारी हे समाजाची खरी गरज पुरी करतात तर हे खोटे बोलून पैसा उकळतात.) मिडब्रेन एक्टीवेशनमुळे मुलांची स्मरणशक्ती वगैरे वाढते ह्याला [...]

July 2019

दारू पिणाऱ्या चे लिव्हर जर डॉक्टरांशी बोलू लागले तर!!! ( When Liver Talks to Deaddiction specialist )

दारू पिणाऱ्या चे लिव्हर जर डॉक्टरांशी बोलू लागले तर!!! नेहमीसारखे दारू पिणाऱ्या व्यक्तींबरोबर व्यसनमुक्तीचे काम करत असताना वरील विचार डोक्यात चमकून गेला. लिव्हर आणि डॉक्टर यांमधील संवाद असा काहीसा असेल. लिव्हर : “ओ डॉक्टर सांगाना याला, तुझा खेळ होतो म्हणा पण माझा जीव जातो.” डॉक्टर : “अरे हो रे बाबा! कळतय मला तुझे दुःख, चल आज तू लिव्हर आणि मी डॉक्टर आपण दोघे मिळून प्रयत्न करूया.” लिव्हर : “खरंच कळत नाहीये का याला ? अशीच शंका येतेय मला सगळ्यात आधी.” डॉक्टर : “नाही रे बाबा, [...]

June 2019

होतो मी डॉक्टर…

स्वप्न होती उरात की सेवा देशाची मी करणार डॉक्टर बनून मनापासून रोगराई दूर करणार ।१ डॉक्टर होताना वाटलं नव्हतं येईल अशीही वेळ या देशाचीच गर्दी माझ्याशी खेळेल असा खेळ ।२ घाम गाळूनी उपचार केले, नाही मी खाल्ले पिले, तेव्हाच नेमके गर्दीने त्या मज रक्तबंबाळ केले।३ या गर्दीच्या आवाजाची ताकद मला समजली, जेव्हा पुकारले एकाने घ्या डॉक्टर ला हाताखाली.।४ हातोहाती लागेल तेथे, वाटेल त्याने मारले, कारण मज मारण्याचे पण काही ना समजले..।५ जेव्हा मी कोमात गेलो, कळवळले माझे बंधू, मेली त्यांची माणुसकी,आता नाही राहणार साधू..।६ अरे साधू सुद्धा लुटताना दिसतो प्रत्येक दारोदारी लोकं [...]

ओसीडी ( Obsessive Compulsive Disorder )

                 आज मी एका ”मानसिक म्हणजेच मेंदूच्या आजाराबद्दल” माहिती देणार आहे. पण हे करत असताना जर एखादा त्रासदायक विचार परत परत माझ्या डोक्यात येत असेल आणि त्यामुळे मी सलग विचार करू शकत नसेल तर. तो विचार माझाच आहे हे मला माहिती आहे, पण मला तसा विचार करायचाच नाहीये. मी कितीही प्रयत्न केले तरी त्या विचारापासून माझी सुटकाच होत नाहीये. असे झाले तर, एकतर माझी चिडचिड होईल आणि कदाचित रडायला सुद्धा होईल. बरोबर [...]

May 2019

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या पंधरा कृती !…

१) सतत पॉझीटीव्ह : कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं! उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे. प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो. आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात. २) प्रेमात पडा :  आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण [...]

March 2019

वर्ल्ड बायपोलार डे ( World Bipolar Day )

               “कभीखुशी कभी गम” हा पिक्चर पाहिलाय का हो ? तगडी स्टारकास्ट आहे त्यामुळे खुप लोकांना आवडला सुद्धा.माझ्यामते या पिक्चर मध्ये कधीतरीच खुशी आणि बऱ्याच वेळा गमच आहे.पणखऱ्या आयुष्यात “कभी बहुत खुशी और कभी बहुत गम” असे झाले तर? केलाय कधी असा विचार ? असे कधी होते का ? असाही विचार आला असेल. नैराश्याविषयी (Depression) बऱ्यापैकी जनजागृती होतीये, पण या लक्षणांच्या विरूद्ध लक्षणे असणाराही आजार असतो त्याला आम्ही उन्माद (हर्षवायु/ Mania)असे म्हणतो. या [...]

इंटरनेट ऍडिक्शन ( Internet Addiction )

        लहानपणी “इंटरनेट शाप की वरदान” या विषयावर मोठ्या हिरीरीने वाद विवाद स्पर्धा व्हायच्या. दोन्ही मतं पटायचे. पण आत्ता लहान मुलांची व किशोरवयीन आणि तरुण पिढीची मानसिक स्थिती ढासळताना पाहून इंटरनेट हा न संपणारा शापच आहे हेच मत बनते. बाल्यावस्था, कुमार वय व तारुण्य या स्थित्यंतरातून जाताना शारीरिक व मानसिक बदल होताना इंटरनेटमुळे स्वतःचा आत्मविश्वास गमावून मुलांचे संपुर्ण व्यक्तिमत्वच बिघडताना पाहिल्यावर फार दुःख होते.         इंटरनेटचे व्यसनाबद्दल आजकाल जाता येता कोणी ना कोणी सांगत असतो.  इंटरनेट चे पण व्यसन होऊ शकते ही काही आता नवीन गोष्ट नाही आपल्यासाठी, पण आपल्यापैकी कोणीतरी हे गांभीर्याने घेतलेय का? [...]

झोपूया मनसोक्तपणे ( Normal Sleep and Insomnia )

जागतिक झोप दिनाच्या निमित्ताने. “नशीबवान आहेस बाबा! नशीब लागते अशी झोप यायला.” एक मित्र दुसऱ्याला “हल्ली ना झोपच येत नाही हो. सकाळी दोन वाजताच उठून बसतो.” एक आजोबा त्यांच्या ग्रुपमध्ये “किती दिवस झाले काय माहिती निवांत झोपून.” इति पोलीस ऑफिसर “हल्ली ना खुप स्वप्न पडतात ग, पण त्यामुळे माझी झोपच नाही होत.” एक मैत्रीण दुसरीला. “हे खुप दात खातात हो झोपेमध्ये. भीती वाटते शेजारी झोपण्याची.” नववधू डॉक्टरांना “अरे, तुला माहिती आहे का, हा झोपेमध्ये चक्क बोलतो.” एक होस्टेलमध्ये राहणारा मुलगा. “डॉक्टर, माझी झोप ना एकदम मांजरासारखी [...]

February 2019

पेशंटच्या गोष्टी डॉक्टरांच्या शब्दात ( Odd case of psychiatry )

               आज एक पेशंट आला, थोडा दचकत तो खुर्ची वर बसला. मनात तर सांगायच आहे सगळ आधी पासून, पण तरी हिंमत होत नव्हती म्हणून अशक्त वाटतय, हात कापतात, झोप येत नाही अशा तक्रारी सुरू होत्या… बर मी मानसरोग तञ म्हणजे मानस शास्रात निपून, म्हणून त्याच्या मनातला गोंधळ कळला मला पण नेमक तो काय लपवतोय हे माञ समजत नव्हत…                आता माझी उत्सुकता वाढत चालली होती. तरी मी त्याला [...]

मानसिक आरोग्य स्वैर विचार ( Mental Health )

               १० ऑक्टोबर हा दिवस १९९२ सालापासून जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो . याचे उद्दीष्ट आहे समाजामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागृती निर्माण करणे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १९४८ मध्ये आरोग्याची व्याख्या करताना मानसिक आरोग्याला महत्वाचे स्थान दिले होते . पण एवढा कालावधी लोटल्यानंतरहि ,आज मानसिक आरोग्य हा आपला दुर्लक्षित किंवा दुय्यम स्थान असलेला विषय आहे, हे वेगळे सांगायची गरज नाहीये. मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तीला आजकाल घरात – दारात – समाजात सगळीकडे वेगळ्या नजरेने बघितले [...]

चिंतेचे चिंतन ( Anxiety and Worry )

                      चिता चिंता समानास्ति !                       बिंदुमात्र विशेषता !!                       सजीवं दहते चिंता !                       निर्जीवं दहते चिता !!                शालेय जीवनातील संस्कृत या विषयामधील हा श्लोक त्यावेळेस त्याचा शब्दश: अर्थ कळाला होता (हो पाठांतरही केले होते). [...]

Schizophrenia ( स्किझोफ्रेनिया )

               आज जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस, त्या निमित्ताने ह्या खुप मोठ्या आजाराची छोटेखाणी ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक (मनाचा आणि मेंदूचा) आजार आहे.                माणसाला माणुसपण देणाऱ्या गोष्टी, जसे कि विचार करण्याची शक्ती, भावना व्यक्त करता येणे, समाजाभिमुख व्यवहार करणे. नेमक्या यांच गोष्टींवर हा आजार हल्ला करतो, आणि त्या रुग्णाचे माणुसपण मग हरवून जाते.                सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा [...]

मनाची शांती (How to achieve Peace of Mind)

               मनाची शांतीतरी मी मानतो कि माहितीची उपलब्धता. ही आपल्या पिढीची सर्वात मोठी ताकद आहे. अक्षरशः कुठल्याही गोष्टीविषयी माहिती आपल्याला एका क्षणात मिळते, ती इंटरनेटच्या झालेल्या अवाढव्य प्रगतीमुळे, आणि स्मार्ट फोन मधील सुधारणांमुळे आपल्याला हे इंटरनेट वापरणे खुपच सोपे झाले आहे. आपल्यावर नुसता माहितीचा भडीमार होत आहे. एक सर्वेक्षण असे सांगते कि १९०० शतकात एका माणसाला जेवढी माहिती त्याच्या संपूर्ण आयुष्यात मिळत होती, ती आज एका आठवड्यात मिळते आहे. यावरून माहितीच्या प्रचंडतेची जाणीव [...]

तंबाखु दुष्परिणाम समजूया.. (World no tobacco day)

               मनोविकार तज्ञ म्हणून काम करताना काही चमत्कारिक (हा शब्द मुद्दाम योजला आहे. चमत्कारिक म्हंटले कि वाचकाची वाचनाची इच्छा जागृत होते.) गोष्टी रोजच घडत असतात.                यामधीलच जवळ जवळ रोज अनुभवाला येणारी गोष्ट. ओपीडी मध्ये रुग्णाची त्याच्या आजाराच्या अनुषंगाने माहिती घ्यावी लागते, पण काही प्रश्न आम्ही डॉक्टर लोकं मुद्दामहून विचारतोच. त्यातला एक महत्वाचा प्रश्न, काही व्यसन वगैरे करता का तुम्ही ?(हा प्रश्न स्त्री-पुरुष, लहान-मोठा, गरीब- श्रीमंत असा भेदभाव [...]

प्रेमाचे सोहळे !!! (Experience in Field of Deaddiction)

प्रेम प्रेम प्रेम… म्हणजे काय असते ?                सर्वात सोपी व्याख्या “प्रेम हे प्रेम असते” (अनन्वय अलंकार). आणि आपल्या बॉलीवुड ने शिकवलेली सर्वात महत्वाची व्याख्या म्हणजे “मुलाने मुलींसाठी व्यक्त (बऱ्याचवेळा अव्यक्त केलेली) भावना.” पण त्यासाठी हा लेखनप्रपंच नाही, त्यासाठी बॉलीवुडचा कुठलाही सिनेमा पहावा. पण मानसोपचारतज्ज्ञ म्हणुन काम करताना आम्ही प्रत्येक वेळेस वेग वेगळ्या प्रकारच्या प्रेमाचे सोहळे पाहत आणि अनुभवत असतो, ते शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न.                सर्वात सोपी व्याख्या “प्रेम हे [...]

मनोलॉजी ( The study of mind and brain )

मनाचा अभ्यास करूया शास्त्रीय दृष्टीकोनातून.                  सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आरोग्यविषयी बदलत्या वातावरणामध्ये मनाचे आरोग्य खुप महत्वाचे ठरत आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वस्थ मनाची माहिती, मानसिक आजार, व्यसने, वर्तणुकीच्या समस्या, उपचार पद्धती आणि मानसिक आजार होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी यांचा अंतर्भाव होतो.तसेच मानसिक आजार हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली छाप सोडून जातात, जसे की लहान मुलांच्या वर्तणुकीच्या समस्या, शैक्षणिक आणि बौद्धिक अडचणी. वृद्धांच्या वयाबरोबरच असणारी शारीरिक आणि मानसिक आजारांची गुंतागुंत. मनाचे आरोग्य दोघांच्याही [...]

बदलत्या जगातील तरुणाचे मानसिक आरोग्य ( Youth and Mental Health )

किशोरावस्था (Children) आणि प्रौढावस्था (Adult) या आयुष्याच्या दोन स्थित्यंतराच्या मध्ये, अतिशय नाजूक, चंचल, व आव्हानात्मक असा एक टप्पा असतो, तो म्हणजे तारुण्यावस्था. म्हणजेच आजकालची यंग जनरेशन.. सध्याच्या वेगाने बदलत्या काळात आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे आयुष्यातील ह्या टप्प्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. हा काळ म्हणजे लहानपणीच्या कौशल्यांमध्ये भर घालण्याचा काळ, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्याचा काळ. त्यामुळे, खरे तर सर्वाना हवाहवासा वाटणारा. पण या स्वातंत्र्या बरोबर येते ती जबाबदारी, आणि या वयात गोंधळ हा असतो की स्वातंत्र्य हवे पण जबाबदारी नको. ह्या सर्वाबरोबर जीवनशैलीमधले खुप मोठे बदल देखील [...]