होतो मी डॉक्टर…
होतो मी डॉक्टर...
स्वप्न होती उरात की सेवा देशाची मी करणार
डॉक्टर बनून मनापासून रोगराई दूर करणार ।१
डॉक्टर होताना वाटलं नव्हतं येईल अशीही वेळ
या देशाचीच गर्दी माझ्याशी खेळेल असा खेळ ।२
घाम गाळूनी उपचार केले, नाही मी खाल्ले पिले,
तेव्हाच नेमके गर्दीने त्या मज रक्तबंबाळ केले।३
या गर्दीच्या आवाजाची ताकद मला समजली,
जेव्हा पुकारले एकाने घ्या डॉक्टर ला हाताखाली.।४
हातोहाती लागेल तेथे, वाटेल त्याने मारले,
कारण मज मारण्याचे पण काही ना समजले..।५
जेव्हा मी कोमात गेलो, कळवळले माझे बंधू,
मेली त्यांची माणुसकी,आता नाही राहणार साधू..।६
अरे साधू सुद्धा लुटताना दिसतो प्रत्येक दारोदारी
लोकं तरीही पुजतात, त्याच्या पायी जसे मेंढरी..।७
कसे कळेना गर्दीला, हा देव होता कधीकाळी
तेच करतोय आताही पण कलयुग आले भाळी।८
पण कळले गर्दी हि नेत्यांची, डोके नसलेल्या भक्तांची
व्यापाऱ्यांची, गुंडांची, नाही ही खऱ्या रक्ताची..।९
गर्दीला का दिसला नाही जीव वाचवलेला डॉक्टर,
का दिसत नाही त्यांच्यासाठीच, न झोपलेला डॉक्टर।१०
घरदार सोडून, लग्न मी मोडून, घरच्यांच्या विरोधात,
दूर आलोय गर्दीस जगवाया, या दुष्काळाच्या प्रदेशात..।११
का कळत नाही हाल आमचे, सोसताना मालकाची सक्ती,
पगाराविना, कर वाढलेली बँकांची नोटीस अन् जप्ती..।१२
नाहीच समजणार जो पर्यंत तुमचा डॉक्टर मुलगा मरतो,
मागे घरात डॉक्टर च्या काय काय तमाशा होतो..।१३
मी प्रार्थना करेल या गर्दीचीही, मुलं डॉक्टर व्हावी,
अन गर्दीने पुन्हा मारण्याची त्यांची रीत पुढे न्यावी।१४
जणूकाही गर्दी हि वाट पाहतेय त्या क्षणाची,
पूर्ण मरेल माणुसकी, अन संहिष्णुता मनाची।१५
जागे व्हा म्हणणार नाही कारण मीही आता मेलोय
कायमचाच, मनातला ‘डॉक्टर मी’ मारला गेलोय..।१६