मानसिक आरोग्य स्वैर विचार ( Mental Health )
१० ऑक्टोबर हा दिवस १९९२ सालापासून जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो . याचे उद्दीष्ट आहे समाजामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागृती निर्माण करणे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १९४८ मध्ये आरोग्याची व्याख्या करताना मानसिक आरोग्याला महत्वाचे स्थान दिले होते . पण एवढा कालावधी लोटल्यानंतरहि ,आज मानसिक आरोग्य हा आपला दुर्लक्षित किंवा दुय्यम स्थान असलेला विषय आहे, हे वेगळे सांगायची गरज नाहीये. मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तीला आजकाल घरात – दारात – समाजात सगळीकडे वेगळ्या नजरेने बघितले [...]