आणि त्याला भुते दिसली….
भूत…. लहानपणापासूनच सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय असतो, तसाच तो राहुलचाही होता. तो नेहमी त्याच्या गावातील भुतांच्या चर्चेमध्ये हिरीरीने भाग घ्यायचा, आणि ठणकावून सांगायचा भूत वगैरे काही नसते. राहूल एक पंचवीस वर्षाचा दुधाचा व्यवसाय करणारा, एकत्र कुटुंबात राहणारा मुलगा. सगळे व्यवस्थित चाललेले आणि आता वय झाले म्हणून त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झालेली. काही दिवसांनी मुलगी पसंत झाली आणि लवकरच त्याचे लग्न ठरले. या धामधुमीत तो सतत नातेवाईकांनी वेढलेला होता. आणि हे लग्न ठरल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जी की अमावस्येची रात्र होती. अचानक [...]