Marathi

Inhalant Abuse

इन्हेलंट ऍब्युझ (Inhalant Abuse) म्हणजे मुद्दामहून चांगले वाटते म्हणून वर उल्लेख केलेल्या पदार्थाचा केलेला वारेमाप वापर. हा समाजातील सर्व स्तरातील मुलांमध्ये दिसून येतो. मुलामुलींमध्ये याचे प्रमाण सारखेच आहे. सहज, स्वस्त आणि कायद्याने मान्यता असलेले असे हे पदार्थ असतात. त्यातच बरेच शैक्षणिक क्षेत्रात रोजच वापरात येतात. त्यामुळे याचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे पदार्थ पटकन लपवता येतात झटकन काम होते आणि आलेली झिंग दहा ते पंधरा मिनिटात निघून पण जाते. आणि हे पदार्थ व्यसनासाठी वापरले जाऊ शकतात याची पुसटशी ही [...]

Read more...

चूक कोणाची ?

साधना (अर्थातच नाव बदलले आहे) एक 38 वर्षांची लग्न झालेली पण तिकडील वागणुकीला वैतागुन माहेरी आलेली. माहेरी येताना झालेली तिची फरफट आणि नंतर येथे सामावून घेताना आलेल्या अडचणींमुळे ती नैराश्याच्या गर्तेत ढकलली गेली. अगदी आत्महत्येचे नियोजन करू लागली आणि त्या दरम्यान आमची भेट झालेली. खरंतर तिच्या मनाविरुद्ध तिचा भाऊ तिला घेऊन आलेला. कारण बाकीच्यांसारखे तिचेही हेच मत होते की, मनोविकारतज्ञ (Psychiatrist) म्हणजे वेड्यांचे डॉक्टर, मला नाही भेटायचे त्यांना आणि मी वेडी नाहीये. सुरुवातीच्या दोन तीन भेटींमध्ये, तिच्या घरची आणि तिच्या [...]

Read more...

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच.

XyZ :- हॅलो ! डॉक्टर मुक्तेश बोलत आहात ना ? मी :- हो मीच बोलतोय. हा माझाच नंबर आहे ना ! XyZ :- नाही आज दिवाळी आहे ना म्हणून असे विचारले. काय म्हणतीये दिवाळी ? मी :- काही नाही घरच्यांबरोबर मस्त गप्पा मारतोय. फोन केलाय काही विशेष ? XyZ :- अहो औषधे संपली आहेत. तुम्ही बोलावले होते म्हणून फोन केलाय. मी :- कधी संपली ? XyZ :- झाले दहा दिवस, दिवाळीच्या तयारीत बिझी होतो ना ! त्यामुळे नाही जमले. आज दिवाळी आहे, म्हंटले गर्दी कमी [...]

Read more...

Antidepressant Drugs Consumption

आपल्याकडे एकतर मनोविकार तज्ञाला भेटायलाच येणार नाहीत. (माहिती असून अंगावर दुखणे काढणाऱ्यांविषयी बोलतोय मी) आले तरी यांचे पहिले वाक्य असते. मी झोपेच्या गोळ्या खाणार नाही. या गोळ्यांची सवय लागते. मानसिक आजारांविषयी आणि त्यांच्या उपचारांविषयी असणाऱ्या अफाट अज्ञानामुळे हे असे बोलतात हे माहिती आहे. पण जेव्हा आम्ही सगळे समजावून सांगतो आणि तरीही लोक औषधोपचार बंद करतात, कारण त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना काहीतरी ज्ञान (कानमंत्र) दिलेले असते. असा राग येतो ना!! पण प्रश्नही पडतो जे आम्हांला तीस मिनिटांमध्ये जमत नाही ते, त्यांचा शेजारी एका वाक्यात [...]

Read more...

नित्य नविन फंडे

आजकाल पेपर वाचणे आणि बातम्या पाहणे, हे म्हणजे अगदीच जाहिराती पाहण्याची इच्छा झाली तरच मी करतो. याची जागा बऱ्यापैकी सोशल मीडिया ने घेतली आहे. मग या 24 तास अखंड वाहणाऱ्या फॉरवोर्ड रुपी नदीतील सुद्धा सगळेच हाती लागेल, असे होणे नाही. तरीपण काही गोष्टी अगदीच लक्ष खेचून घेतात. आणि मग पडतात ते वेगवेगळे प्रश्न. रोज शपथ घेतल्यावर, शपथेची ताकद वाढते की कमी होते ? हा अगदी सकाळीच डोक्यात आलेला विषय. एखाद्या गोष्टीची शपथ द्यावी लागणे म्हणजे ती नक्कीच तेव्हढी महत्वाची आहे, [...]

Read more...

गोळ्या संपल्या का रे ह्याच्या ?

सध्या निवडणूकीची धामधूम आहे. वेगवेगळे नेते आपल्या आर्थिक आणि बौद्धिक कुवतीनुसार स्टंटबाजी करत असतात. ते तर करणारच त्यांचे ते कामच आहे. पण एखादी स्टंटबाजी जास्तच वेगळी झाली की, मग खरा खेळ चालू होतो. खेळ, तो कोणता तर त्यांच्या त्या फालतू स्टंट बाजीला मानसिक आरोग्याशी आणि आजाराशी जोडण्याचा. यात मोठे मोठे राजकीय कारकिर्द असणारे नेते सुद्धा मागे नाहीत. मग “याचे डोके सटकले आहे” यापासून सुरू होणारी यांची मुक्ताफळे, “याच्या गोळ्या (मनोविकारतज्ज्ञांनी दिलेल्या) संपल्या असतील.” इथपर्यंत किंवा कधीतरी यापेक्षाही खालच्या पातळीवर घसरतात. [...]

Read more...

WORLD MENTAL HEALTH DAY

आज 10 ऑक्टोबर म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. मानसिक आरोग्याचा प्रचार आणि प्रसार हा याचा मुळ उद्देश. माझ्यासारख्या मनोविकारतज्ञाला भेटणारे सर्वच म्हणतात की आजकाल तुम्हां सायकियाट्रिस्ट लोकांची खूप गरज आहे. पण जेव्हा खरंच गरज असते तेव्हा आपण काय करतो ? जेव्हा आपल्या घरातील कोणाला, मित्राला, शेजाऱ्याला जेव्हा सायकियाट्रिस्ट कडे घेऊन जातात, त्यानंतर आपण त्यांच्याशी कसे वागतो ? जेव्हा त्या व्यक्तीला आपल्या मदतीची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा आपण काय करतो ? दुसऱ्याचे सोडा, जेव्हा आपले नेहमीचे डॉक्टर आपल्याला सायकियाट्रिस्ट ला भेटण्याचा सल्ला देतात, [...]

Read more...

नात्यांतील सीमोल्लंघन

नाती, कितीतरी प्रकारची, कितीतरी तऱ्हेची. आयुष्य सुरू करणारी, फुलवणारी, रंगवणारी, उद्धस्त करणारी आणि उध्वस्तपणातून परत सावरणारी सुद्धा. आयुष्याला खरा अर्थ येतो तो अश्या चांगल्या जोपासलेल्या, सांभाळलेल्या आणि खुलवलेल्या नात्यांनी. पण आज आजूबाजूला पाहिल्यावर काय दिसते. तर आपण ! आपल्या बऱ्याच हसत्या खेळत्या नात्यांना प्रोफेशनल या गोंडस नावाखाली कोंडून ठेवले आहे किंवा त्याला तसा मुलामा तरी दिला आहे. छान हसणारे आणि सांभाळून घेणारे ते नाते, प्रोफेशनल कधी झाले आणि त्याला व्यवहाराचे नियम कधी लागले. त्यात नको असलेला पोक्तपणा कधी शिरला हे [...]

Read more...

वैचारिकतेचा विचार करताना

ते शास्त्र असते. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला जर ती पटवून द्यायची असेल तर ‘शास्त्र’ हा शब्द तिला जोडून द्यायचा, काम झालेच म्हणून समजा. कारण एकमेव भारतातील शास्त्र हे असे आहे की त्याच्या चिकित्सेला परवानगी नाही. असे केल्याने शास्राचा अपमान होतो, हे पण शास्रातच लिहिलेले आहे म्हणे. उदाहरण द्यायची गरज नाही ज्याने त्याने आप आपल्या आजूबाजूला थोडेसे चिकित्सेने पाहिले तरी बरीच उदाहरणे दिसतील. तर अश्या संस्कारांमध्ये वाढलेल्या मुलांनी पुढे जाऊन स्वतःच वैचारिक दृष्टिकोन (Critical Thinking) शिकावा अशी आपली अपेक्षा आहे. जी की [...]

Read more...

जगणं थांबवलेली माणसे.

“अरे काय महेश, काय चाललंय तुझे ? ज्या ट्रिपची आपण एव्हढी स्वप्न रंगवलेली, ती का कॅन्सल केलीस ? थांब रे बाबा ऑफिसमध्ये जरा गडबड आहे, नंतर जाऊच की.” “अगं संध्या, कधीतरी येत जा की कीटी पार्टीला. सगळ्यांच्या भेटीगाठी होतात, छान वाटते. एवढं क्लिनिक जरा सेट होऊ दे, मग नक्की.” “घेतलेस का नवीन कपडे अम्या ? की तुझे नेहमीसारखेच जरा वजन कमी करतो मग घेतोच की.” “काय रे श्रेयांश घेतलास का कॅमेरा ? की परत दिवाळीच्या बोनस ची वाट पाहतो आहेस तुझा छंद [...]

Read more...