Schizophrenia ( स्किझोफ्रेनिया )
आज जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस, त्या निमित्ताने ह्या खुप मोठ्या आजाराची छोटेखाणी ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक (मनाचा आणि मेंदूचा) आजार आहे. माणसाला माणुसपण देणाऱ्या गोष्टी, जसे कि विचार करण्याची शक्ती, भावना व्यक्त करता येणे, समाजाभिमुख व्यवहार करणे. नेमक्या यांच गोष्टींवर हा आजार हल्ला करतो, आणि त्या रुग्णाचे माणुसपण मग हरवून जाते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा [...]