मिडब्रेन एक्टीवेशन – एक आधुनिक भोंदूगिरी
मिडब्रेन एक्टीवेशन हे आधुनिक बुवाबाजीचे खास उदाहरण! असली भोंदूगिरी तथाकथित धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा घातक होत चालली आहे. यांत सामान्य नागरीकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. त्याला वैज्ञानिक व वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार हवा तेवढा विरोध करतांना दिसत नाहीत. एकीकडे अनेक धार्मिक श्रद्धा लोकांना जीवनाची विधायक दिशा देतांना दिसतात तर दुसरीकडे असले विज्ञानाचा बुरखा घातलेल्या ह्या गैरव्यापारी वृत्ती समाजाची दिशाभूल करतांना दिसतात. (गैरव्यापारी यासाठी की व्यापारी हे समाजाची खरी गरज पुरी करतात तर हे खोटे बोलून पैसा उकळतात.) मिडब्रेन एक्टीवेशनमुळे मुलांची स्मरणशक्ती वगैरे वाढते ह्याला [...]