कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच.
XyZ :- हॅलो ! डॉक्टर मुक्तेश बोलत आहात ना ? मी :- हो मीच बोलतोय. हा माझाच नंबर आहे ना ! XyZ :- नाही आज दिवाळी आहे ना म्हणून असे विचारले. काय म्हणतीये दिवाळी ? मी :- काही नाही घरच्यांबरोबर मस्त गप्पा मारतोय. फोन केलाय काही विशेष ? XyZ :- अहो औषधे संपली आहेत. तुम्ही बोलावले होते म्हणून फोन केलाय. मी :- कधी संपली ? XyZ :- झाले दहा दिवस, दिवाळीच्या तयारीत बिझी होतो ना ! त्यामुळे नाही जमले. आज दिवाळी आहे, म्हंटले गर्दी कमी [...]