Antidepressant Drugs Consumption

Antidepressant Drugs Consumption

आपल्याकडे एकतर मनोविकार तज्ञाला भेटायलाच येणार नाहीत. (माहिती असून अंगावर दुखणे काढणाऱ्यांविषयी बोलतोय मी)

आले तरी यांचे पहिले वाक्य असते. मी झोपेच्या गोळ्या खाणार नाही. या गोळ्यांची सवय लागते.

मानसिक आजारांविषयी आणि त्यांच्या उपचारांविषयी असणाऱ्या अफाट अज्ञानामुळे हे असे बोलतात हे माहिती आहे. पण जेव्हा आम्ही सगळे समजावून सांगतो आणि तरीही लोक औषधोपचार बंद करतात, कारण त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना काहीतरी ज्ञान (कानमंत्र) दिलेले असते. असा राग येतो ना!!

पण प्रश्नही पडतो जे आम्हांला तीस मिनिटांमध्ये जमत नाही ते, त्यांचा शेजारी एका वाक्यात कसे करून दाखवू शकतो. आणि मग त्याच्याच पुढे मी स्वप्न देखील पाहतो जेव्हा प्रत्येकाचा शेजारी, शारीरिक आजारासारखे महत्व मानसिक आजाराला देखील देईल, जेव्हा प्रत्येकाचा शेजारी मानसिक आजाराचा त्रास समजून घेऊन तो बरा करण्यामध्ये हातभार लावेल, जेव्हा प्रत्येकाचा शेजारी मानसिक आजारांवरील औषधांची योग्य माहिती घेईल, तेव्हा ! आणि तेव्हा खरे मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तीला खरी मदत मिळेल. कारण त्यावेळेस आजार लपवण्याची गरज पडणार नाही आणि योग्य वेळात उपचार झाल्यामुळे आजार कंट्रोल सुद्धा चांगला होईल.

प्रगत देशांमध्ये नैराश्य घालवणारी औषधे किती प्रमाणात वापरली जातात हे दाखवणारा खालील आलेख.

माहिती घ्या, जण जागृती वाढवा आणि मानसिक आरोग्य संवर्धनामध्ये आपला हातभार लावा. कारण या आजारांमध्ये एक व्यक्ती जरी बरी झाली तरी संपूर्ण एक कुटुंब सुधारते.

मुकाम्हणे

डॉ. मुक्तेश दौंड,
मनोविकार तज्ञ,
निम्स हॉस्पिटल,
नाशिक.