कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच.

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच.

XyZ :- हॅलो ! डॉक्टर मुक्तेश बोलत आहात ना ?
मी :- हो मीच बोलतोय. हा माझाच नंबर आहे ना !
XyZ :- नाही आज दिवाळी आहे ना म्हणून असे विचारले. काय म्हणतीये दिवाळी ?
मी :- काही नाही घरच्यांबरोबर मस्त गप्पा मारतोय. फोन केलाय काही विशेष ?
XyZ :- अहो औषधे संपली आहेत. तुम्ही बोलावले होते म्हणून फोन केलाय.
मी :- कधी संपली ?
XyZ :- झाले दहा दिवस, दिवाळीच्या तयारीत बिझी होतो ना ! त्यामुळे नाही जमले. आज दिवाळी आहे, म्हंटले गर्दी कमी असेल येऊ पट्कन भेटून डॉक्टरांना.
मी :- म्हणजे डॉक्टरांना दिवाळी नसते तर ?
XyZ :- नाही हो डॉक्टर असे कुठे म्हणतोय मी.
मी :- नाही आज दिवाळीच्या दिवशी एवढ्या तातडीने फोन केलात ? मला वाटले काही इमर्जन्सी असेल ?
XyZ :- नाही हो सहज, पूजा झालीये, जेवायला वेळ आहे, म्हंटले यावे कन्सल्ट करायला.
मी :- अहो आम्हांला पण घरची मंडळी आहेत. आम्ही पण माणसे आहोत आणि सर्वात महत्वाचे आम्हांलाही सण साजरे करायला आवडतात. आपण भेटूया 31 तारखेला.

आणि पुढे काही ऐकून घेण्याच्या आधी फोन कट केला. आणि छान घरच्यांबरोबर चाललेल्या चर्चेत सहभागी झालो. कारण या लोकांच्या तोंडाला आणि नसलेल्या डोक्याला लागून काही फायदा नसतो, हे देखील अनुभवातून आलेले शहाणपण.

हे सांगायचे कारण आहे का हो ? आहे नक्कीच आहे. कुठलाही डॉक्टर फोन नंबर देतो तो इमर्जन्सी मध्ये काही अडचण आली तर, ना की कधीही क्षुल्लक कारणासाठी फोन करून त्रास करून घेण्यासाठी.

आपल्याकडे स्वतःचा मोठेपणा मिरवण्याची खूप फालतू सवय आहे लोकांना, त्यातून सुद्धा डॉक्टरांना कधीही विनाकारण फोन केले जातात. जे डॉक्टरांच्या व्यक्तिगत आयुष्यात नक्कीच ढवळाढवळ करतात. ऑड वेळेस फोन केल्यावर डॉक्टर बोलण्याच्या स्थितीत आहे की नाही याची साधी विचारपुसही न करता क्षुल्लक आणि वेळ खाणाऱ्या निरुद्देश गप्पा मारत बसतात.

अपॉइंटमेंट (कुठलाही वेळ) कधीही न पाळणारे आम्ही, कुठल्याही आजाराला गांभीर्याने न घेणारे आम्ही, औषधांचे नियम न पाळणारे आम्ही, चांगल्या सवयी न पाळणारे आम्ही. डॉक्टरांना कधीही त्रास देण्याच्या आणि औषधांच्या साईड इफेक्ट बद्दल, मात्र भलतेच जागरूक असतो. असे पेशंट येतात ना तेव्हा आम्हीही कुठेतरी खूप प्रोफेशनल होऊन जातो.

त्या Xyz व्यक्तीचा फोन मी ब्लॉक केला हे वेगळे सांगायची गरज नाही. लहानपणी “लांडगा आला रे आला” ही गोष्ट सगळ्यांनी ऐकली असेल. असेच कधीही अवेळी आणि विनाकारण फोन करून आपणही डॉक्टरांना तसे वागण्यास प्रवृत्त करत आहोत हे विसरू नका. नाहीतर जेव्हा खरंच इमर्जन्सी असेल तेव्हा तुमचे डॉक्टरांनी फोन उचलला नाही तर दोष कुणाचा ? हे ज्याचे त्याने ठरवावे.
डॉक्टरांसाठी थोडेसे “Emergency is emergency, No argument About it. But Please define concept of Emergency for yourself, as per your Branch and Experience. Please don’t get exploited under name of Emergency. Accept that you are human with human limitations. Please try to keep your professional and personal life separate. It’s okay to give priority to your family or yourself, nothing wrong in it. Please stop flaunting your inhumane working hours. That’s all For beginning of more healthy emotional life of yourself.”

कोणाच्याच आयुष्यात मोबाईल मुळे, “लांडगा आला रे” आला होऊ नये यासाठी…..

#मुकाम्हणे

डॉ. मुक्तेश दौंड
मनोविकारतज्ञ,
निम्स हॉस्पिटल,
नाशिक.